2 ऑक्टोबर ला गडचिरोली च्या दौऱ्यावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन ; गोंडवानाच्या दीक्षांत समारंभाला अतिथी.
गडचिरोली : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.राज्यपाल म्हणून सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच गडचिरोली दौरा आहे. यापूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या कार्यकाळात तीन वेळा गडचिरोली जिल्ह्यात येऊन गेले.
राज्यपाल राधाकृष्णन यांचे दुपारी 12 वाजता गडचिरोली येथे आगमन होईल. ते गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ आणि वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थित राहतील.
दुपारी 1 ते 1.45 पर्यंत त्यांचा वेळ शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहणार आहे.दुपारी 1.45 ते 4.30 पर्यंत विश्रामगृह येथे मान्यवरांशी भेटी आणि चर्चा असा कार्यक्रम आहे.याच दरम्यान ते ग्रामीण भागात भेट देण्याची शक्यता होती,मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दुपारी 4.40 वाजता गडचिरोली येथून ते नागपूरकडे प्रयाण करतील.