25 व्या राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा जलतरण संघाची यशस्वी कामगिरी.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रह्मपुरी : २३/०९/२४ महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स अक्वॅटिक असोसिएशन, नागपूर डिस्ट्रिक्ट वेटरंन्स स्विमिंग असोसिएशन नागपूर आणि हनुमान स्पोर्ट्स अकॅडमी नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सिल्व्हर ज्युबिली वर्षानिमित्त २५ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक २१ व २२ सप्टेंबर २०२४रोजी एनआयटी स्विमिंग पूल नॉर्थ अंबाझरी रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आली.
त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून २५ वर्ष ते १०० वर्षांपर्यंतचे जवळपास ५०० महिला व पुरुष जलतरणपटू राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले. चंद्रपूर जिल्हातुन संघ व्यवस्थापक शिवराज मालवी व धनंजय वडाळकर यांच्या नेतृत्वामध्ये ब्रह्मपुरी येथून शिवराज मालवी, देवेश पठाणू, प्रशांत मत्ते, पराग राऊत ,आचल राऊत, स्पारटॅकस शेंडे, एडवोकेट हेमंत उरकडे,
अनंत वाघ, प्रशांत वसाके असे ०९ जलतरणपटू तर चंद्रपूर येथून कैलास किरडे ,आशिष पिंपळकर, नितेश राठोड, नामदेव राऊत, स्नेहल राऊत, असे ०५ जलतरणपटू, असे एकूण १४ जलतरणपटू चंद्रपूर जिल्ह्यातून सहभागी झाले व आपापल्या वयोगटात यशस्वी कामगिरी करत पदकं मिळवली.
शिवराज मालवी यांनी ६० -६४ या वयोगटातुन सहभागी होत १०० मिटर बॅकस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल,१०० मिटर फ्रिस्टाईल मध्ये ब्राँझ मेडल, २००मिटर फ्रिस्टाईल मध्ये ब्राँझ मेडल व २०० मिटर वैयक्तिक रिले मध्ये ब्राँझ मेडल असे एकूण ०४ ब्राँझ मेडल, देवेश पठाणू याने २५ - २९वयोगटात ५० मिटर बॅकस्ट्रोक मध्ये सिल्व्हर मेडल व ५० मिटर फ्रिस्टाईल मध्ये ब्राँझ मेडल,तर स्नेहल राऊत हिने मेडल ५० मिटर बॅकस्ट्रोक मध्ये ब्राँझ मेडल मिळविले.तसेच नितेश राठोड, पराग राऊत, स्पारटॅकस शेंडे,देवेश पठाणू यांनी ४ X ५० मिटर फ्रिस्टाईल रिले प्रकारात गट क्रमांक दोन १२०-१५९ या वयोगटात ब्राँझ मेडल मिळवून चंद्रपूर जिल्ह्याच नाव राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत रोषण केले.
तसेच महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स अक्वॅटिक असोसिएशनने सतत २५वर्षे राज्यात विविध ठिकाणी राज्य स्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केल्या व आपले २५ वर्षे पूर्ण करून सिल्व्हर ज्युबिली वर्ष मान्यवरांच्या हस्ते मंचावर केक कापून उत्साहाने साजरे केले.
व त्या प्रित्यर्थ स्पर्धेकरीता प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व देत व भरीव कामगिरी करणाऱ्या निवडक जलपटूंना महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स अक्वॅटिक असोसिएशन तर्फे " सदा फुलत राहणा-या सख्ख्या बद्दल " हे ब्रिद वाक्य कोरलेले सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.चंद्रपुर येथील नामदेव राऊत व ब्रम्हपुरी येथील शिवराज मालवी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.