जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 16 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बाळापूर) येथे शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये इयत्ता 6 वीत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in या ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी सदर लिंकवर जाऊन अर्ज भरावा,असे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य,मीना मनी यांनी कळविले आहे.