फॅशन शो 15 सप्टेंबर च्या उदघाटनाला अन्न व औषध प्रशासन मंत्री,धर्मराव बाबा आत्राम व अभिनेत्री सारा खान यांची उपस्थिती.

फॅशन शो 15 सप्टेंबर च्या उदघाटनाला अन्न व औषध प्रशासन मंत्री,धर्मराव बाबा आत्राम व अभिनेत्री सारा खान यांची उपस्थिती.


मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : जेटीएम स्टार इव्हेट्सच्या वतीने आयोजीत फॅशन शो च्या कार्यकमासाठी विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट सेलिब्रिटी सुश्री सारा खान उपस्थित राहणार आहेत.तर फॅशन शो चे उदघाट्न अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे हस्ते होणार आहे. 

दि.15 सष्टेंबर रविवार ला सांस्कृती लॉन आरमोरी रोड गडचिरोली येथे फॅशन शो आयोजीत करण्यात आलेले आहे.सदर कार्यक्रमात मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री,सारा खान उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रसिद्ध सौदर्य स्पर्धा आणि फॉशन शोच्या मुख्य संयोजिका,ज्योती उंदिरवाडे यांनी दिलेली आहे. 


या शोमधे मॉडेलिंग स्पर्धा,मेकअप आणि मेहंदी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.तसेच विजेत्यांना पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.गेल्या काही वर्षापासून ज्योती उंदिरवाडे फॉशन शो चे आयोजन करतात त्यांच्या कार्यक्रमात भरपूर प्रतिसाद मिळत असतो.फॉइन शो च्या कार्यक्रमात नामवंत चित्रपट कलावंताना आमंत्रित करतात. 


होवू घातलेला कार्यकमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सारा खान यांची उपस्थिती लाभणार आहे. व यातूनच जिल्हातील युवाकांना एक प्रकारचे व्यासपिठ निर्माण करून देतात तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फॉशन शो च्या संयोजिका,ज्योती उंदिरवाडे यांनी केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !