बसपा ची दिक्षाभुमी ते चैतन्यभुमी संविधान जनजागरण रॅली 01 ऑक्टोंबर ला गडचिरोली जिल्हयात आगमण.

बसपा ची दिक्षाभुमी ते चैतन्यभुमी संविधान जनजागरण रॅली 01 ऑक्टोंबर ला गडचिरोली जिल्हयात आगमण.                                  


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली जिल्यामध्ये बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र तर्फे दिक्षाभुमी ते चैतन्यभुमी पर्यत "आरक्षण बचाव बहुजन बचाव" करिता संविधान जनजागरण रॅली आयोजन केले आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने भारतीय संविधानावर व आरक्षणावर देशभर उलट सुलट चर्चा होत आहे. अशावेळी बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने संविधान व आरक्षण मागील भुमिका तसेच शत्रूपक्ष व मित्रपक्ष समजून सांगण्यासाठी दिनाक 01 ऑक्टोंबर 2024 रोज मंगळवारला गडचिरोली जिल्हयात बसपा प्रदेश कार्यकारणीची राज्यस्तरिय संविधान जनजागरण रॅली येणार आहे. 


तसेच गडचिरोली येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर भवन (DSR) सभागृहात  ठिक :- 12:00 वाजता जिल्हा कार्यालय उद्घाटन  तथा भव्य कार्यकर्ता मेळावा, पक्षप्रवेश कार्यक्रम बसपा गडचिरोली तर्फे घेण्यात येणार आहे. संविधान रॅलीचे नेत्तृत्व मा. अशोक सिद्धार्थ केद्रिय प्रभारी बसपा तथा माजी खासदार राज्यसभा बसपा, मा. सुनिल डोगरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र,बसपा हे आहेत.


दिक्षाभुमी वरुन रॅलीची सुरूवात होऊन नागपुर-भंडारा ते वडसा मार्गे गडचिरोली येथे आगमण होणार यावेळी गडचिरोली बसपा कार्यकर्ते व पदाधिकारी भव्य स्वागत करणार आहेत. यावेळी मा. भाष्कर मेश्राम जिल्हा प्रभारी, मा. शंकर बोरकुट जिल्हाध्यक्ष बसपा, प्रदिप खोब्रागडे जिल्हा प्रभारी, गणपत तावाडे जिल्हा प्रभारी, मायाताई मोहुर्ले महिला जिल्हाध्यक्ष बसपा, कैलास कोडागुर्ला बिव्हिएफ संयोजक, खुशाल डोगरे अहेरी 


विधानसभा अध्यक्ष, मंदीप गोरडवार  विधानसभा अध्यक्ष गडचिरोली, कृपानंद सोनटक्के विधानसभा अध्यक्ष आरमोरी, रमेश मडावी माजी प्रदेश सचिव,वामन राऊत माजी जिल्हाध्यक्ष,नरेश महाडोळे,सुधिर वालदे, भिमराव पात्रीकर,दिवाकर फुलझेले,अनिल साखरे,सोमाजी धारणे,मारोती वनकर,बंडु वाळके,विलास म्हशाखेत्री,सुमन कहाडे,वेणुताई खाब्रागडे,पोर्णिमा मेश्राम व इतर पदाधिकार्यानी बहुजन समाजाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !