पोंभूर्णा तालुक्यात भारतीय ओबीसी महापरिषद व बहुजन समता पर्वतर्फे रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन.

पोंभूर्णा तालुक्यात भारतीय ओबीसी महापरिषद व बहुजन समता पर्वतर्फे रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन.


राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!


पोंभूर्णा : दिनांक 18 ऑगस्ट रविवारला सकाळी 10.00.वाजे पासून पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथे भारतीय ओबीसी महापरिषद व बहुजन समता पर्व जिल्हा चंद्रपूर च्या वतीने रोग निदान व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.संजय घाटे,अध्यक्ष बहुजन समता पर्व व अध्यक्ष,भारतीय ओबीसी महापरिषद जिल्हा चंद्रपूर व अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर हे होते. 


सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार श्री.देवरावजी भांडेकर यांचे हस्ते महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाले सदर शिबिराकरिता चंद्रपुरातील प्रख्यात वैद्यकीय तज्ञ- हृदयरोग तज्ञ डॉ प्रसाद पोटदुखे,स्त्री रोग तज्ञ व जिल्हा स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ.मनीषा घाटे (पोटदुखे) ह्या बरोबरच दंतरोगतज्ञ डॉ.रिजवान शिवजी,सर्जन डॉ अक्षय वाघमारे,डॉ.सौरभ माने,डॉ पवन चांदेकर तसेच इतर अनेक तज्ञ डॉ.उपस्थित होते. 


या शिबिराचा लाभ " देवाडा - पोंभूर्णा " क्षेत्रातील शेकडो नागरिकांनी घेतला तसेच आजारानुसार औषधी सुद्धा देण्यात आल्या.त्याचबरोबर चंद्रपूर येथे होणाऱ्या भारतीय ओबीसी महापरिषद करिता  सर्व समाज बांधवांनी दोन दिवशी परिषदे करिता चंद्रपूर येथे येण्याचे आव्हान आयोजक डॉ.संजय घाटे यांनी केले. सदर आरोग्य शिबिर देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालय मध्ये घेण्यात आले.


सदर शिबिराला या विभागातील सरपंच तसेच इतर लोकप्रतिनिधी व गणमान्य लोक उपस्थित होते तसेच शिबिर यशस्वी होण्याकरिता भारतीय ओबीसी महापरिषदेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष राहुल सोमनकर , विजय वासेकर.एकनाथ बुरांडे.जगण कोहळे. कालिदास मोहुले.विकास ठाकरे सुनिल दिवस आदींनी आपले योगदान दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !