बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर च्या वतीने नेचर फाउंडेशन,नागपूर कलावंताचे कलापथक कार्यक्रम.

बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर च्या वतीने नेचर फाउंडेशन,नागपूर कलावंताचे कलापथक कार्यक्रम.


एस.के.24 तास


वरोरा : महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग सहाय्यक संचालक - इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपूर चे वतीने 15 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रचारासाठी तालुकास्तरीय मेळावा आयोजन करण्यात येत आहे. 



या निमित्याने आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे विविध शासकीय योजना बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नीलकंठ शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती  येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष, उपप्राचार्य  धोटे मॅडम नीलकंठ शिंदे महाविद्यालय भद्रावती , 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - प्रा. डहेगावकर, प्राचार्य डी. डी.दोहतरे कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय गौराळा,भद्रावती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मुख्याध्यापक  पी. एफ. पवार यांनी केले. मार्गदर्शन कार्यक्रमा च्या सुरुवातीला कलापथक जनजागृती कार्यक्रम व माहिती रथ नेचर फाउंडेशन,नागपूर चे कलावंताच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. 


यावेळी कलावंत सुनील कापटे,गायक - सुनील  नन्नावरे,वादक -सूरज राजनहिरे,पथकप्रमुख -विलास चौधरी व रथाचे सारथी राहुल झाडे यांनी सहभाग घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !