मोदी आवास योजनेचे हप्ते रखडले ; घरकुलाचे थकीत निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करुन घरकुल लाभार्थ्यांना दिलासा द्यावा. - ग्रा.पं.सदस्य,राकेश गोलेपल्लीवार
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : तालुक्यातील हक्काचे घर मिळावे यासाठी मोदी आवास योजना राबविल्या जात आहे मात्र घरकुल लाभार्थ्यांना वेळोवेळी हप्ते मिळत नसल्याने घरकुलाचे काम करणे कठीण झाले आहे निधी अभावी अनेक लाभार्थ्यांचे काम रखडले आहे घरकुल बांधकाम करण्यासाठी दिड लाखांचा निधी मिळत असतो पन माहागाई वाढली असल्याने दिड लाखात घरांचे बांधकाम होत नसताना देखील शासनाच्या मदतीने दिड लाखांचा निधी घेऊन आर्थिक संकटात उभे झाले आहेत.
घरकुल बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य चे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाभार्थी उसन वाळी करुन बांधकाम करताना दिसत आहेत त्यामुळे शासनाने घरकुल निधी मध्ये वाढ करण्यात येवुन मोदी आवास योजनेअतर्गत घरकुलाचे थकीत असलेले हप्ते लाभार्थाच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.
घरकुलाचे एक हप्ता शासनाने लाभार्थीचे खात्यात जमा करुन घरकुल बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना मंजुरी दिली त्यामुळे घरकुल लाभार्थी बांधकाम करण्यास सुरुवात केले मात्र दुसरा हप्ता शासनाने लाभार्थीचे खात्यात निधी जमा न केल्याने घरकुल लाभार्थी संकटात सापडले असुन बांधकाम थडावस्थात पडले असल्याने अनेक लाभार्थ्यांची निवासाची व्यवस्था करणे.
कठीण झाले असल्याने मोदी आवास योजने अंतर्गत घरकुलाचे थकीत निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करुन घरकुल लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रा.पं.सदस्य, राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.