सावली तालुक्यातील घोडेवाही शेतशिवारात जंगली डुकरांच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु असून शेतात काम करीत असलेल्या सौरव विलास नागापुरे वय,18 वर्षे या युवकावर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून सावली रुग्णालयात भरती केले. तात्पुरते उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे.
आज सकाळी सौरव हा आपल्या शेतावर गेला असता अचानक रानटी डूकरांने हल्ला चढविला.या हल्ल्यातून सौरव ने स्वतची सुटका करण्याचा प्रयत्न केला पण डूकरांने एकसारखा हल्ला चालूच ठेवल्याने सौरव गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या कमरेला जास्त मार असून हात,पाय व डोक्याला मार लागलेला आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.तर जखमी सौरवला गडचिरोली येथे भरती केले आहे.मागील महिन्यातच कवटी पारडी मार्गावर शाळेच्या मुलीवर व तीन कवाडी येथील शेतकरयांना रानडूकरांने हल्ला केल्याची घटना असताना परत रानटीडूकरांने हल्ला करून जखमी केले.असल्याने या रानटीडूकरांना ठार मारण्याची परवानगी द्यावी अशी नागरिकांमध्ये चर्चा चालु आहे.