बामसेफ च्या वर्धा येथील राज्य अधिवेशनात अफाट गर्दी ; कॉग्रेसने ७० वर्षात ओबीसींची जातनिहाय जनगणना केली नाही. ★ भाजप कॉग्रेसकडून बहुजनाना मुर्ख बनविण्याचे काम करीत आहे - वामन मेश्राम बामसेफ

बामसेफ च्या वर्धा येथील राज्य अधिवेशनात अफाट गर्दी  ; कॉग्रेसने ७० वर्षात ओबीसींची जातनिहाय जनगणना केली नाही.


★ भाजप कॉग्रेसकडून बहुजनाना मुर्ख बनविण्याचे काम करीत आहे  - वामन मेश्राम बामसेफ 


 गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 


वर्धा - कॉग्रेसच्या ७० वर्षाच्या कार्यकाळात ओबीसीची जात निहाय जनगणना केली नाही मग बिजेपी तर दूरच , कॉग्रेस भाजपा बहुजनाना मुर्ख बनविण्याचे काम दोन्ही पक्षाकडून सुरु आहे . कधी कॉग्रेस तर कधी बिजेपी म्हणजे ब्राम्हणच सता गाजवत आहेत . परंतू ८५ % बहुजन समाज सतेपासून दूर आहे. 

सतेची चाबी हातात येणासाठी एससी एसटी ओबीसी संघटन शक्ती सत्तेत   परिवर्तन करू शकते . यासाठी बामसेफची विचारधारा गावागावात पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे . अशाप्रकारचे मोलाचे मार्गदर्शन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी वर्धा येथील बामसेफच्या राज्य अधिवेशनात केले .

       


बामसेफचे राज्य अधिवेशन सरोज मंगलम सभागृह वर्धा येथे वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले . अधिवेशनाचे उद्घाटक संविधान तज्ज्ञ देविदास घोडेस्वार हे होते तर प्रमुख अतिथी प्रितम प्रियदर्शी , ॲड . स्मिता कांबळे , कुंदा तोडकर , ॲड . सुनिल डोंगरदेवे , प्रेमकुमार बोबडे , मंगला थोरात, दिपक वासनिक, विठ्ठल दाङगे व आदी चे समायोचित मार्गदर्शन झाले .

       

लुंबिनी नेपाळ येथे दि . २३ सप्टे ते २७ सप्टे २०२ ४ ला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनात्मक प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकानी केले. अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून बामसेफचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !