नंदकिशोर वाढई यांची राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती.
राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच म्हणून ज्याची ओळख असलेले आणि सराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामाजिक चळवळीतून तयार झालेले, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून काम करणारे स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची राजीव गांधी पंचायती राज संघटन काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेऊन त्यांची प्रदेश सचिव पदी निवड केली आहे.
सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कळमना गावात आपल्या नेतृत्व कौशल्याचे उत्तम उदाहरण स्थापित केले असून चंद्रपूर जिल्हातील अनेक ग्रामपंचायती आणि तेथील स्थानिक नेतृत्वाशी ते चिरपरिचित आहेत. नेहमी सामाजिक बांधिलकी जपत ते काम करत आहेत.
तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अनेक कमेटी वर तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर ते काम करी आहेत. त्यांच्या या कार्याची दखल काँग्रेस पक्षाच्या राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मानिय संजयजी ठाकरे साहेब, नारायण सिंग राठोड साहेब प्रभारी राजीव गांधी पंचायती राज संघटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना पक्ष वाढीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपणास मिळालेल्या राज्य पातळीवरील पदाचा काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरण करण्यासाठी सदुपयोग करण्याचा आणि धडाकेबाज काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे.