बदलापूर घटनेबाबतउद्या गडचिरोली बंद ; महाविकास आघाडी ची पत्रकार परिषदेतून माहिती.

बदलापूर घटनेबाबतउद्या गडचिरोली बंद ; महाविकास आघाडी ची पत्रकार परिषदेतून माहिती.


गडचिरोली मुनिश्रर बोरकर 


गडचिरोली : महाराष्ट्रात मागील अडीच वर्षापासून शिंदे- फडणवीस सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारा वर काहीच कारवाई करताना दिसत नाही. बदलापूर येथील चिमुकल्या चार वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. त्याच तत्त्वावर गडचिरोली येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्या २४ ऑगस्टला गडचिरोली बंद चा नारा दिलेला आहे.


हा बंद सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत पाळला जाणार आहे.यात प्रामुख्याने व्यापार दुकाने प्रतिष्ठान,शाळा,महाविद्यालय बंद राहणार आहेत.


पत्रकार परिषदेला खासदार डॉ.नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र),काँग्रेस गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,राम मेश्राम माजी नगराध्यक्ष, वासुदेव शेडमाके जिल्हाध्यक्ष (उबाठा गट),सतीश विधाते शहराध्यक्ष काँग्रेस,विजय गोरडवार शहराध्यक्ष (शरदचंद्र पवार गट), डॉ.सोनल कोवे काँग्रेस कार्यकर्त्या, छाया कुंभारे महिला जिल्हाध्यक्ष (उबाठा गट),शीतल ठवरे शहराध्यक्ष (उबाठा गट), नंदू कुमरे, प्रकाश ताकसंडे यांचे सह महाविकास आघाडी तील अनेक मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला हजर होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !