डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात स्वातंत्र्य दीन साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०८/२४ स्वातंत्र्याचा ७८वा वर्धापन दिनानिमित्त स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल ब्रम्हपुरी,मीराबाई नर्सिंग कॉलेज,तसेच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बी एड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव प्राचार्य,डॉ.देवेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळेस लेप्ट.सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात एन सी सी गर्ल्स युनिट ६० विद्यार्थिनींनी मानवंदना दिली.त्याचबरोबर संस्थे अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहण प्रसंगी ब्रम्हपुरी पब्लिक स्कूच्या प्राचार्य रीमा कांबळे,संस्थेच्या सदस्या डॉ स्निग्धा कांबळे शारीरिक विभागाचे बुरखंडे ,पर्यवेक्षक प्रकाश उके तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.