डॉ.संतोष सुतार " मानद डॉक्टरेट " पदवी ने सन्मानित.

डॉ.संतोष सुतार " मानद डॉक्टरेट " पदवी ने सन्मानित.


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


वर्धा : ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट कडून कोल्हापूर जिल्ह्यात अल्टरनेटिव्ह मेडिसिन च्या माध्यमातून काम करणारे वेगवेगळ्या आजारातील रुग्णांना दिलासा देणारे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन अल्टरनेटिव्ह मेडिसिनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर, संतोष सुतार यांना विश्व मानवाधिकार संस्था, यांच्याकडून अल्टरनेटिव्ह विभागातील मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले.


या यशामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी,डॉ.साक्षी सुतार,आयुष भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलानी सर यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकारी व सभासदांचे सहकार्य लाभले.


डॉ.संतोष सुतार हे आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,तसेच श्री.स्वामी समर्थ पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट चे व्हाईस चेअरमन असून गेली सात वर्ष ते बोरपाडळे येथे प्रॅक्टिस करत आहेत,त्यांनी कोविड काळात 24 तास सेवा केली आहे.


एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात येऊनही सेवा चालूच होती,गेल्या पाच वर्षात सलग तीन वेळा आदर्श डॉक्टर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे,तसेच गगनबावडा व पन्हाळा प्रेस क्लब चा आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे,अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातील ते पहिले प्रॅक्टिशनर आहेत.

 

डॉ.विनोद देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे डॉ.मोहन बमनोटे विदर्भ अध्यक्ष,डॉ.किशोर बमनोटे अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ.अमित साखरे वर्धा जिल्हा अध्यक्ष,डॉ.विपुल पाटिल वर्धा जिल्हा अध्यक्ष आयुष भारत डॉ.असो विदर्भ यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा अभिनंदन देण्याचा आले.

 या यशाबद्दल अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !