मुल येथे भूमिपुत्र ब्रिगेड च्या वतीने नवनियुक्त मुख्याधिकारी,संदीप दोडे साहेब यांचे सदिच्छा भेट.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : नव्याने रुजू झालेल्या मुल नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी संदीप दोडे साहेब यांचे भूमिपुत्र ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली.
भूमिपुत्र ब्रिगेड तालुका मुल च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करीत भूमिपुत्र ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली व व नगरपरिषदेच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी नितेश मॅकलवार भूमिपुत्र ब्रिगेड शहराध्यक्ष, राकेश मोहुर्ले,सचिन आंबेकर,विक्रम गुरुनुले,संतोष चिताडे,मनोज मोहुर्ले,आकाश आरेवार,प्रणय बेंगले,मनीष मोहुर्ले,पिंटू पिंपळे,जगदीश नेंताम,जगदीश मोहुर्ले,अतुल मडावी, आदी भूमिपुत्र ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.