ओबीसी नेते,चंद्रकांत गुल्हाने यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बहुजन चळवळीमध्ये कार्यरत असलेले धडाडीचे बहुजन नेते चंद्रकांत गुल्हाने यांनी जगप्रसिद्ध लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांचे नेतृत्व स्वीकारत पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश करून पक्षाचा रिपब्लिकन निळा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
दिनांक 5 ऑगस्ट 2024 सोमवार रोजी, कठोरा रोडवरील आनंदवाडी स्थित सुभद्रा मेंशन या त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी 5 वाजता.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या एका छोटेखानी प्रवेश समारंभात बहुजन नेते चंद्रकांत गुल्हाने यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये आपण अधिकृत प्रवेश घेत असल्याचे जाहीर केले.
यावेळी पक्षाचे अमरावती शहर अध्यक्ष एडवोकेट दीपक आकोडे कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर वराडकर धामणगाव विधानसभा प्रभारी प्रकाश रंगारी उपस्थित होते . पक्षात प्रवेश घेतल्यानंतर पीआरपी प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा निळा दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आपल्या प्रवेशा संबंधी बोलताना चंद्रकांत गुल्हाने म्हणाले की आपण बुद्ध ,फुले, शाहू ,डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असून शिवाजी महाराजांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्याची अनेक दिवसापासून आपली इच्छा होती. बहुजन चळवळीसह आंबेडकरी चळवळीला अगदी जवळून पाहत असताना ज्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी व ओबीसींच्या हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून देशात
सर्वप्रथम रणशिंग फुंकले असे आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक व त्यागी नेतृत्व असलेल्या माजी खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश केल्याने आज माझा संकल्प पूर्ण होत असल्याचे समाधान वाटत असून यापुढे डॉ.बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार अंगीकारून पक्षाला मजबूत करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे असे ओबीसी नेते चंद्रकांत गुल्हाने यांनी बोलताना आवर्जून सांगितले.
यावेळी उपस्थित शहराध्यक्ष एडवोकेट दीपक आकोडे वासुदेव सामटकर, भास्कर वराडकर ,प्रकाश रंगारी, युवा आघाडी अध्यक्ष प्रवीण सरोदे ,बीपी इंगोले, चंद्रभान मोहोड, डी.जे .खडसे, जुबेरखान शेख ,प्रेमचंद अंबादे ,शेफुद्दीन खान, अमोल चतुर, जुली शबनम, सुनील इंगोले ,माणिक गाडगे ,यांचे सह चंद्रकांत गुल्हाने यांचे अनेक सहकारी उपस्थित होते.