महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव भोसले येथे शिक्षक पालक,शाळा व्यवस्थापन व ईतर शालेय समित्यांची स्थापना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०६/०८/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे आज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ओ.एम. बगमारे सर यांचे अध्यक्षतेखाली शिक्षक,पालक संघाची आमसभा संपन्न झाली. त्यामध्ये पालकांमधून सर्व संमतीने शिक्षक - पालक संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यानंतर शालेय कारभार सुस्थितीत व शिस्तबद्ध पद्धतीने चालावा या दृष्टिकोनातून ,शालेय विद्यार्थ्यांच्या सोयी ,सुविधा, गरजा पूर्ण करून विद्यालयात आनंदमय वातावरण राहण्याच्या दृष्टिकोनातून शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली.शालेय विद्यार्थिनी वरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये.
यासाठी शालेय मुलींना संरक्षण देण्यासाठी महिला अत्याचार निवारण समिती आणि वर्ग पाच ते आठ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार युक्त भोजन देण्याच्या दृष्टिकोनातून शालेय पोषण आहार यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी शालेय पोषण आहार समिती व क्रीडा,सांस्कृतिक ,आरोग्य या सारख्या समित्यांचे गठन करण्यात आले.सभेच्या निमित्याने विद्यार्थी विकास, शाळेचा विकास यावर साधक - बाधक चर्चा करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.सभेला उपस्थित बहुसंख्य पालक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार श्री सचिन क-हाडे सर यांनी मानले.