सिंदेवाही तालुक्यातील रिपाईच्या विविध गटाची बैठक संपन्न.
★ रिपाईच्या सर्व गटानी एकाच उमेदवाराची निवड करून कामाला लागावे.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
सिंदेवाही : रिपब्लिकन पार्टीच्या विविध गटाची बैठक मनमंदिर हाटेल शिंदेवाही येथे पार पडली .सदर बैठकीचे अध्यक्ष रिपाई नेते अध्यक्ष अशोक रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर. आदि लाभले होते.याप्रसंगी अशोक रामटेके म्हणाले की , कांग्रेस पक्ष आम्हाला झुलवित आहे आता कांग्रेस भाजपाला न झुकता रिपब्लिकन पार्टी मधे १७ गट असले तरीही ते संपूर्ण गट एकत्रीक करून एकच उमेदवार दिला तर रिपाईचा उमेदवार निवडून येवू शकतो . मी पिरिपाचा आहे तरीही मी वंचित कडे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला आहे.
ती उमेदवारी भेटते की नाही माहीत नाही पण सर्वानी ठरविले आणि कोणताही उमेदवार दिला तरीही मी तयार आहे .आरक्षणात अबकड वर्गवारी होणार ते होता कामा नये यासाठी येत्या २१ ऑगष्टच्या भारत बंद मधे सर्वांनी सहभाग होवून भारत बंद यशस्वी करावा. याप्रसंगी गोपाल रायपूरे म्हणाले की दगडापेक्षा विट बरी म्हणत होतोआता विटही बरी वाटायला लागली नाही. बाबासाहेबाचा रिपब्लिकन पक्षआम्ही चालवित आहोत.
त्यांच्या विचारांचाच पक्ष सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो . विधानसभेच्या निवडणुकीत रिपाईच्या सर्व गटा - तटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास विजय होवू शकतो जर रिपाईच्या मतानी जर कांग्रेसचे उमेदवार येवू शकतात तर मग रिपाईचा उमेदवार निवडून का येवू शकत नाही . आपण सर्वांनी कामाला लागावे . प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की भाजपा व कांग्रेस एकाच माळेचे मणी आहेत.
आता पर्यंत रिपाईने कांग्रेसला साथ दिली. परंतु निवडणुकी नंतर वाईट अनुभव आलेत म्हणुन ब्रम्हपुरी विद्यानसभा क्षेत्राच्या निवडनुकीत रिपाईतील जेवढे गट एकत्र येतील यातुनच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना उभा करणे महत्वाचे ठरेल. निवडणूक जिंकणे किंवा हरणे हा रिपाईचा विषय नाही कारण रिपब्लिकन पार्टी ८०% टक्के समाजकारण व २०% राजकारण करतो. तरीही राजकारणाशिवाय पर्याय नाही . ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कुणबी लॉबी व एस सी लॉबी एकत्र कशी येइल याचाही प्रयत्न करायला काही हरकत नाही.
बैठकीचे संचलन राजकुमार रामटेके यांनी तर आभार नंदु खोब्रागडे यांनी मानले . बैठकीला प्रामुख्याने माजी सरपंच भोजराज सोरदे , मुकुंदा गेडाम ' किशोर साखरे महिला आघाडीच्या ,शांताबाई पाझारे किशोर साखरे , नरेश रामटेके , सुरेश खोबागडे हेमंत साखरे शुकदेव अलोणे , सत्यजित रामटेके राजु मेश्राम दिनेश लोखंडे ब्रम्हपुरी पालक अलोणे विकास बनपूरकर सुरेखा रामटेके आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.