आरोग्य विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; गडचिरोली च्या आशा वर्करचा दिल्लीत सन्मान.


आरोग्य विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; गडचिरोली च्या आशा वर्करचा दिल्लीत सन्मान.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक
मो.नं. - 8805113505


गडचिरोली : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडचिरोली येथील आशा स्वयंसेविका उमा तिरुपती  चालूरकर  यांना  लाल किल्ला नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.


स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध विभागातील उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या कर्मचारी यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनी सन्मान केला जातो तसेच या सोहळ्यात त्यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाते. 


जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका,उमा तिरुपती  चालूरकर यांना आमंत्रित केले असल्याचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.महाराष्ट्रातील दोन आशा व एक एन एम ना आमंत्रण आहे .महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील या आशा स्वयंसेवीकेला हा मान मिळाला आहे.महाराष्ट्रात फक्त दोनच आशांना  हा मान मिळाला आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील आशा स्वयंसेवीकेला हा मान मिळाल्यामुळे आरोग्य विभागातून तसेच सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन केले जात आहे.आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल हा सन्मान मिळाला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,प्रताप शिंदे यांनी सांगितले.


स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक,14 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन उत्सवानिमित्त  आशा स्वयंसेविका श्रीमती,उमा चालूरकर यांना दिल्ली येथे विज्ञान भवन मध्ये श्रीमती अनुप्रिया पटेल, केंद्रीय स्वस्थ एवं परिवार कल्याण तथा रसायन उर्वरक राज्य मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !