आमदार,विजय वडेट्टीवार यांच्याकडून चारगाव येथे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक २६ ऑगस्ट २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून चारगाव येथील साप चावून मृत पावलेल्या गरीब शेतकऱ्याचा कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे.
स्व.बंडू मांदाळे वय ५४ वर्षे रा.चारगाव सदर मृतक हे भूमिहीन शेतमजूर होते, घरातील कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते,सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतात काम करीत असताना सापने चावा घेतला परंतु दवाखान्यात पोचण्याआधी विष खूप पसरल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा पश्च्यात बराच मोठा परिवार असल्याने त्यांना आर्थिक माहिती असल्याची सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच त्यांनी आमदार,विजय वडेट्टीवार यांना संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने,सरपंच सौ.ज्योतीताई बहिरवार,युवा कार्यकर्ता मा.श्रीकांत बहिरवार,मा.चिरकूटा कुंभरे,मा.सनतकुमार बोरकर,मा.दिलीप दुधे,मा.रमेश डोंगरे,मा.भगवान नर्मलवार प्रकाश कुकुडकर आदी उपस्थित होते.