विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे शालेय मंत्रि मंडळाची स्थापना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०८/०८/२४ विकास विद्यालय,अ-हेर नवरगाव त. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ चे शालेय मंत्रिमंडळाची विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम. बी .धोटे सर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही पद्धतीने स्थापना करण्यात आली.
या शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री- कु. अंजली रामा पिलारे,
उपमुख्यमंत्री - विशु वासुदेव मदनकार,
शालेय आरोग्य मंत्री - कु. आरती जयेंद्र भागडकर
शालेय स्वछता मंत्री- कु. पुनम विजय जराते
शिक्षण मंत्री - कु. साक्षी वकेकार यांची निवड करण्यात आली.
सदर नवनियुक्त खातेनिहाय मंत्रिमंडळाची त्यांचे कडून मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री के. जी. घरत सर यांनी कर्तव्य बजावले. मुख्याध्यापक श्री एम .बी. धोटे सर यांनी निवड झालेल्या शालेय मंत्र्यांना त्यांची कर्तव्य व जबाबदारी समजावून सांगितली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.