भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी तालुक्याची कार्यकारीणी जाहीर.
★ सरचिटणीस पदी,मनोज वठे, रामलाल दोनाडकर,ज्ञानेश्वर दिवटे व गोपाल ठाकरे यांची नियुक्ती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२७/०८/२४ भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी तालुक्याचे अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे यांनी नुकतीच आपली कार्यकारीणी जाहीर केली आहे. या कार्यकारीणी मध्ये तालुका सरचिटणीस पदी ब्रह्मपुरीचे माजी नगरसेवक मनोज वठे, ब्रह्मपुरी पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. रामलाल दोनाडकर, बल्लारपूर येथील ज्ञानेश्वर दिवटे व जुगनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच गोपाल ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सरचिटणीस पदांमध्ये तालुक्यामधील सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करून भौगोलिक समतोल अध्यक्ष शेंडे यांनी साधला आहे.
या कार्यकारीणीमध्ये तालुका उपाध्यक्षपदी अरुण झंजाळ, निराशा तोंडफोडे (महिला), प्रकाश नन्नावरे (अनु. जमाती), अनिल तिजारे, मदन मैंद, धर्मपाल राहटे (अनु. जाती) व विजय जिभकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तालुका सचिव पदी अभय कुथे, सुभाष नन्नावरे, लता ठाकरे (महिला), सचिन लिंगायत (अनु. जाती), सुधाकर मडावी (अनु. जमाती), विनोद नखाते व गिरीधर अलबनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोषाध्यक्ष पदी पांडुरंग भोयर तर प्रसिध्दी प्रमुख पदी प्रा. संजय लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य पदी वामनराव मैंद, संजय भोयर, खोजराम पा. बुद्धे, विश्वनाथ नखाते, दिलीपराव राऊत, माणिकराव मोहूर्ले, विठोबाजी बुराडे, श्रीहरी बुराडे, मनोज मैंद, संभाजी शेंडे, प्रल्हाद सेलोटे, ईश्वर मैंद, राजेंद्र राऊत, गिरिधर ठाकरे व सुधीर पिलारे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारीणी मध्ये विविध आघाड्यांच्या तालुका अध्यक्ष पदांची सुद्धा घोषणा यावेळी तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे यांनी केली आहे. यात युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी अविनाश मस्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. शीला गोंदोळे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे,
व्यापारी आघडी तालुकाध्यक्ष घनश्याम तोमटी, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष पदी विलास वाकुडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पदी पुंडलिक पा. झोडे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ निहाटे, अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, मत्स्य व्यवसाय पालन मोर्चा तालुकाध्यक्ष पदी बाळकृष्ण साखरे,
अल्पसंख्यांक मोर्चा तालुका अध्यक्षपदी अजितसिंग दुधानी, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पदी धीरज पाल, भटके विमुक्त जाती मोर्चा तालुकाध्यक्ष भीमराव माहुरे, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष चरणदास मेश्राम, जेष्ठ कार्यकर्ता आघाडी तालुकाध्यक्ष पदी केवळराम नरुले, अध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष पदी भोजराज मानागुडधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारीणी मध्ये विशेष निमंत्रित म्हणून डॉ. गोकुलदास बालपांडे, शंकर दादा सातपुते, डॉ. मोरेश्वर कळसकर, नामदेवराव राऊत, नीलकंठ राव मानापुरे, बीसेन प्रधान, पुरुषोत्तम खेवले, शंकर ठवकर, दामोदर पा. मैंद यांची नियुक्ती झाली आहे.
तालुका कार्यकारीणी मधील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ब्रह्मपुरी विधानसभेचे भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, विस्तारक प्रा. कादर शेख, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वंदना शेंडे,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा. प्रकाश बगमारे, जिल्हा उपाध्यक्ष माणिक पा. थेरकर, जिल्हा सचिव रश्मी खानोरकर, जिल्हा सचिव साकेत भानारकर, कृ.उ.बा.स संचालक प्रा. यशवंत आंबोरकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनय देशकर त्यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.