विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे शिक्षक पालक संघाची स्थापना.

विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे शिक्षक पालक संघाची स्थापना.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,१५/०८/२४ विकास विद्यालय अ-हेरनवरगाव त.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे शैक्षणिक सत्र२०२४-२५ ची शिक्षक पालक समिती दिनांक १२/०८२४ला स्थापन करण्यात आली . शिक्षक -पालक समिती कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम.बी.धोटे सर, उपाध्यक्ष पालक श्री. राजकुमार पिलारे,सचिव श्री के.जी.घरत सर व सहसचिव म्हणून सौ.बेदरे ताई यांची निवड करण्यात आली.




त्यानंतर शिक्षक- पालक सभेत शिष्यवृत्ती ,एन एम एम एस, नवोदय विद्यालय,परीक्षा इत्यादी शैक्षणिक बाबींचा आढावा घेण्यात आला.


शिक्षक - पालक सभेला बहुसंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. ए. ठेंगरे सर यांनी केले तर आभार श्री के .जी. घरत सर यांनी मानले. कार्यकारिणी गठीत करण्यात सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांचे सहकार्य लाभले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !