चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालय जवळ अज्ञात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालय जवळ अज्ञात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.


एस.के.24 तास


गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी रात्री चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालयाजवळ घडली.


मंगेश राजेंद्र नैताम वय,25 वर्ष असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी मंगेश काही कामा निमित्त गडचिरोली जिल्हा मुख्यालयात आला होता.काम आटोपून रात्री तो MH.33 N 4535 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावाकडे परत जात होता.


चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात तो गंभीर जखमी झाला.अपघात नंतर मंगेश ला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. 


यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटने संदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !