★ आदिवासींनी क्रांतीविर बिरसा मुंडा यांना आदर्श समजून संविधानकर्ते आंबेडकरांनी तुम्हचा विकास केला अश्या थोर पुरुषांचा आदर्श मानण्यातच तुमचे भले आहे.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : आदिवासी बांधवानी क्रान्तीविर बिरसा मुंडा , पेरसापेन ' विर बाबुराव सडमाके ' झाशिची राणी दुर्गावती व इतरही आदिवासीच्या पुज्य दैवतांना माणुन वाटचाल करीत आहात.
यात ज्या संविधान कर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी तुम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात आणुन आरक्षणानाने नोकऱ्या दिल्या आहेत. तुमचा विकास ज्यांनी केला अश्या महापुरुष बाबासाहेबांना सुद्धा हदयात ठेवा अश्या प्रकारचे मार्गदर्शन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी जागतिक मुलनिवासी , आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात केले.
जागतिक मुलनिवासी दिनाचा कार्यक्रम विश्रामगृह गडचिरोली येथे प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे ,सामाजीक कार्यकर्ते प्रमोद बाबोळे , मोहन मोटघरे , मारोती भैसारे , वनिता पदा आदि लाभले होते.
याप्रसंगी कानेकर सरांनी सांगीतले की जागतिक आदिवासी दिन नसुन हा जागतिक मुलनिवासी दिन म्हणुन पाळला पाहिजे.इतर देशात मुलनिवासी दिन व भारतात आदिवासी दिन कसे ? याप्रसंगी रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे,मोहन मोटघरे,वनिता पदा आदिंची समायोचित भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचालन बांबोळे सर आभार शांतीलाल लाळे यांनी मानले. कार्यक्रमास पुंडलिक शेंन्डे , प्रमोद राऊत ' अमरकुमार खंडारे , माजी नगरसेवक तुळसिदास सहारे,किशोर उंदिरवाडे ,रोशन उके जिवन मेश्राम , यज्ञराज जनबंधु , मोरेश्वर निमगडे , खेमचंद इंदुरकर , विक्की बांबोळे , शरद लोणारे , दिलीप तेलंग , लवकुंश भैसारे , अनमोल डोंगरे , चरण बारसागडे , श्रीरंग उँदिरवाडे , दामोदर शेंन्डे , शालीकराम मडावी , वामन गेडाम , एलं सी. मडावी ,दिक्षा बांबोळे आदिसहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक देवानंद शिंपी यांचा सत्कारही करण्यात आला.