नाली उपसून रस्त्यावर टाकलेली माती विद्यार्थी व वाहनधारक व वाहतुकीला अडथळा.

नाली उपसून रस्त्यावर टाकलेली माती विद्यार्थी व  वाहनधारक व वाहतुकीला अडथळा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,०८/०८/२४ अ-हेरनवरगाव ते ब्रह्मपुरी रोड वरती ब्रम्हपुरी बांधकाम विभागाने रस्त्यावरून पाणी वाहू नये म्हणून रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यातील माती जेसीबीच्या साह्याने काढून त्या खोल केल्या आणि उपसलेली माती,मुरुम आणि झाडे रोडच्या बाजूला रांगेमध्ये ठेवली.

पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे सदर माती,मुरमाचे ढीग रोड वरती पसरून रोड संपूर्ण लाल व चिखलमय झालेला आहे.शालेय विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जात असताना मागे किंवा समोरून येणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावरील चिखल विद्यार्थ्यांच्या गणवेशावरती उडल्यामुळे त्यांना शाळा , कॉलेज पासून वंचित राहावे लागते.

या रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे . समोरून एखादे वाहन आले तर दुसऱ्या वाहन धारकाला आपले वाहन थांबवावे लागते.एखादे रिकामे ट्रक किंवा रुग्णवाहिका सारखे वाहन सदर रस्त्यावरती आले तर दुसऱ्या वाहनाला मातीच्या ढिगार्‍यामुळे बाजूला वाहन उभे करण्यासाठी बऱ्याच लांब अंतरापर्यंत वाहन धारकाला आपले वाहन मागे मागे न्यावे लागते.


 तेव्हा त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.ब्रह्मपुरी ते वडसा हा सरळ मार्ग सध्या बंद असल्यामुळे ब्रह्मपुरी ते कुर्झा- अ-हेरनवरगाव - पिंपळगाव भोसले , वडसा हा वळण मार्ग सुरू आहे.या मार्गावरून वाहनांची सतत सेकंदा सेकंदाला वर्दळ सुरु आहे. 


या रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीची वाहतूक लक्षात घेता नाली उपसलेली माती व झाडे यांची त्वरित योग्य विल्हेवाट संबंधित बांधकाम विभागाने लावून अ-हेरनवरगाव ते ब्रह्मपुरी रोड वरून ये जा करणाऱ्या नांदगाव, भालेश्वर, पिंपळगाव भोसले,अ-हेरनवरगाव वाशीय जनतेची अडचण लक्षात घेऊन या रस्त्यावरून सुखद प्रवास करण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !