दुचाकीने गावी सोडून देतो सांगून १५ वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार ; महेश गोरे ला अटक.

दुचाकीने गावी सोडून देतो सांगून १५ वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी अत्याचारमहेश गोरे ला अटक.


एस.के.24 तास


अमरावती : दुचाकीने गावी सोडून देण्याची बतावणी करून एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेण्यात आले.तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला.हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. 


ही धक्कादायक घटना कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.महेश रमेश गोरे वय,25 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो एका गावातील सरपंचाचा मुलगा असल्याची माहिती आहे.


कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित 25 वर्षीय मुलगी ही अमरावतीला शिक्षण घेत आहे.शनिवारी सायंकाळी ती बसची वाट पाहत अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात उभी होती.त्यावेळी महेश हा दुचाकीने तेथे आला. त्याने पीडित मुलीला गावी सोडून देतो,असे म्हटले.महेश हा परिचयातील असल्याने ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर दोघे दुचाकीने गावाकडे जाण्यास निघाले.


महेशने मार्डी पोहोचण्यापूर्वीच मार्गात दुचाकी थांबविली. तो पीडित मुलीला चिखली शिवारातील निर्जनस्थळी घेऊन गेला.तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला.पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली.आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. 


हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यावर नागरिकांनी महेशला चोप दिला.त्यानंतर घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच ठाणेदार डॉ. अनुपकुमार वाकडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी महेशला आपल्या ताब्यात घेतले.


या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी महेशविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. 


न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलींच्‍या सुरक्षिततेविषयी पालकांमध्‍ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !