मुल येथे क्रांतीदिनाचे औचित्य साधून " अबे पोट्टे हो फ्रेम " नितेश कराळे उपस्थित राहणार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : ०९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून संतोषसिंह रावत मित्र परिवार यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळावा शुक्रवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता कर्मवीर कन्नमवार सभागृह मूल येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.एन.एस.कोकोडे निवृत्त संचालक गोंडवाना विद्यापीठ,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संतोषसिंह रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मुख्य मार्गदर्शक मा.नितेश कराळे फिजीक्स अकॅडेमी वर्धा,मुख्य मार्गदर्शक मा.डॉ.प्रशांत ठाकरे सहाय्यक प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,प्रमुख उपस्थिती मा.संदीप गड्डमवार अध्यक्ष भारत शिक्षण मंडळ सावली,प्रमुख उपस्थिती ऍड.अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल कार्यक्रमाला प्रामुख्याने लाभणार आहेत.
शैक्षणिक दृष्ट्या जीवनाला नवी दिशा आणि प्रेरित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोषसिंह रावत मित्र परिवार यांनी केले आहे.