चुकीच्या प्रचाराला ताकतीने उत्तर देवून जनतेला सत्य पटवून सांगा. - आमदार डॉ.देवराव होळी
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : राज्यातील भाजप व महायुतीचे सरकार आल्यापासून जनतेच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना राबवित आहे. आपणही आमदार म्हणून मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे केलेली आहे. मात्र त्या योजनाबाबत अपप्रचार करून जनतेला त्यापासून वंचित ठेवण्याचा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेला असून भाजपा
कार्यकर्त्यांनी त्यांच्या चुकीच्या अपप्रचाराला तेवढ्याच ताकतीने उत्तर देत सर्वसामान्य लोकांना आपण केलेली कामे व शासनाच्या योजनांची सत्यता पटवून सांगावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली भाजपा तालुका कार्यकारणीच्या बैठकीच्या प्रसंगी केले.
गानली सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला तालुक्यातून अपेक्षित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवून उत्साह दर्शविला.
याप्रसंगी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी म्हणाले की लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्यात त्या विधानसभा निवडणुकीत होता कामा नये. भाजपाच्या खासदार , आमदारांनी केलेली विकास कामे भाजप कार्यकर्तांनी गावागावात जावून सांगा , विजय भाजपाचाच होणार आहे.
गडचिरोली तालुका मेळाव्यात भाजपाने नेते बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे रमेशजी भूरसे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल पोहनकर, यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर जिल्ह्याचे महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला आघाडी जिल्ह्याच्या अध्यक्षा गीताताई हिंगे, डॉक्टर चंदाताई कोडवते डॉ.नितीनजी कोडवते , तालुका महामंत्री आकाश निकोडे,रमेश नैताम ,देवानंद चलाख, मारोती कोलते प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर , संचालन माजी उपसभापती विलासजी दशमुखे, शोक प्रस्ताव तालुका महामंत्री आकाश निकोडे, यांनी तर आभार प्रदर्शन महामंत्री बंडूभाऊ झाडे यांनी केले.