अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या मुंबई आंदोलनाला यश : नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्य़ातील सरपंचांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुबंई : अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष,जयंत पाटील, राज्य सल्लागार प्रा.राजेंद्र कराडे, विदर्भ अध्यक्ष अँड,देवा पाचभाई यांच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजीत एक धरणे आंदोलनाला यश मिळाले असून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वात जिल्हातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होत मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले.
आंदोलन प्रचंड प्रभावी असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे (श. प.) नेते शरदचंद्रजी पवार, शिवसेनेचे (उ.बा.ठा.) नेते उध्दवजी ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन सत्तापक्ष आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळींसह मीडियाला दखल घ्यावी लागली.
लढाई अजुन संपलेली नाही तूर्तास आपण आश्वासनावर थांबलो आहे,भविष्यात सुध्दा आपल्याला दक्ष राहावे लागेल जेव्हा जेव्हा गावगाडा चालवणारे सरपंचावर अन्याय केला जाईल तेव्हा तेव्हा आपण सर्वच अन्यायाविरुद्ध लढा कायम ठेऊ अशी भावना अ.भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सरपंच,नदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप,कोरपना अध्यक्ष,अरुण काळे, सचिव,अरुण रागीट,राजुरा अध्यक्ष,शंकर मडावी, गोंडपिपरी अध्यक्ष,देविदास सातपुते,सावली अध्यक्ष,पुरुषोत्तम चुधरी,मुल अध्यक्ष,राहुल मुरकुटे,भद्रावती अध्यक्ष,प्रदीप महाकुलकर,पोंभुर्णा अध्यक्ष बोधनकर, जिवती अध्यक्ष सिताराम मडावी, वरोरा अध्यक्ष नयन जांभुळे, मंगेश भोयर, नागभीड अध्यक्ष गणेश गडडमवार, संध्याताई पाटील,चिमूर अध्यक्ष सोनावणे यासह चंद्रपूर जिल्ह्य़ातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.