आरमोरी विधानसभा क्षेत्रातील डोंगरमेंढा या गावातील गोंड गोवारी समाजाला खेमराज भाऊ नेवारे यांनी दिली भेट.
एस.के.24 तास
आरमोरी : शंकरपूर ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरमेंढा या गावाला खेमराज भाऊ यांनी भेट दिली असता माजी पोलीस पाटील श्रीरामजी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. श्रीरामजी राऊत यांनी समाजाच्या विविध समस्या मांडल्या त्या प्रसंगी गावातील किशोर राऊत, नेताजी कोहळे, मनोज राऊत, यांच्या उपस्थितीत गावामध्ये क्रांतिसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला छत व सभामंडप नाही या परिसरात अस्वच्छता असून चिखलाचे मैदान आढळून आले.
तसेच शिवरामजी नेवारे यांची सदिच्छा भेट घेऊन विविध बाबींवर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर गोंड गोवारी स्मारकाला सभा मंडप देण्यात यावा अशी मागणी संपूर्ण गोंड गोवारी समाज तसेच दिनेश राऊत, नागसेन धारगावे, सुरज धुर्वे, असे युवा तरुणांनी केली. इतर नागरिकांची भेट घेतली असता त्यांनीसुद्धा गावातील विकासकामे घडवण्यासाठी खेमराज भाऊ नेवारे यांना एकमताने सहकार्य करण्याचा निर्धार केला.