विद्यार्थ्यांसाठी विशेष बस उपलब्ध करून द्या अन्यथा भूमिपुत्र ब्रिगेडचा आंदोलन करण्याचा इशारा.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : दिनांक ०१ जुलै २०२४ पासून नियमित शाळा व महाविद्यालय सुरु झाले आहे तरी शाळा व कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची संख्या भरपूर असल्याने विद्याथ्यांना उभे राहून जावे लागत आहे. बसेसची सुविधा नियमित नसल्यामुळे त्यांची शाळाचा तास, वर्ग सोडावा लागत आहे व त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मोठ्या संख्येने विद्यार्थी चांदापुर येथून मूल कडे प्रवास करतात व शाळा सकाळी ७.०५ ला भरते. पूर्वी ही बस सुविधा सुरू होती मात्र आता ती बंद करण्यात आली आहे. बस उशीराने आल्यामुळे विध्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी परतीसाठी दुपारी १ वाजताची बस सुविधा होती,ती देखिल बंद झाली आहे.
मानव विकास ची बस विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे विध्यार्थांना बसायला जागा नाही आणि बस सुद्धा विशेष विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे महाविद्यालयाच्या व शाळेच्या वेळेवर बसची सुविधा देण्यात येते नसल्याने डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र ब्रिगेड मूल शहराध्यक्ष नितेश मॅकलवार यांचा नेतृत्वात आगार बस स्थानक प्रमुख मुल येथे निवेदन देण्यात आले.
परंतु पुन्हा बसेसची असुविधा व विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास भूमिपुत्र ब्रिगेड मैदानात उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे त्यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडचे राकेश मोहुर्ले,सचिन आंबेकर,संतोष चिताडे,मनोज मोहर्ले,राहुल बारसागडे,आकाश आरेवार व अनेक कार्यकर्ते, व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.