१ ऑगस्ट २०२४ च्या एससी एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणा च्या सर्वोच्च न्यायालया निर्णया विरोधात भारत बंद आंदोलन समर्थनार्थ ब्रम्हपुरी कडकडीत बंद ! व धरणे आंदोलन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२०/०८/२४ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या दिनांक १ ऑगस्ट २०२४ च्या अनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तसेच क्रिमिलेअर अटीच्या निर्णयाविरोधात दिनांक २१ ऑगस्ट २४ बुधवार ला पुकारण्यात आलेल्या संपूर्ण भारत बंद आंदोलनाला ताकतीनिशी भक्कमपणे पाठिंबा, समर्थन देण्यासाठी ब्रह्मपुरी कडकडीत बंद च्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय ब्रह्मपुरी तालुक्यातील अनुसूचित जाती / जमाती संघर्ष समितीने घेतलाआहे.
अनुसूचित जाती/ जमाती उपवर्गीकरण व क्रीमिलेअर बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाने संसदीय कायदा पारित करावा या प्रमुख मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुका अनुसूचित जाती जमाती संघर्ष समिती यांनी ब्रह्मपुरी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय संसदीय कायदा पारित करून रद्द करण्यात यावा या मागणीसाठीआज दिनांक २० ऑगस्ट २४ मंगळवार ला सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
आज २०/०८/२४ मंगळवार ला होणाऱ्या धरणे आंदोलनात व उद्या २१ /०८/२४ बुधवार ला सकाळी ०८ ते सायंकाळी ०६ -०० वाजेपर्यंत होणाऱ्या कडकडीत भारत बंद आंदोलन समर्थनार्थ ब्रह्मपुरी तालुका कळकळीत बंद मध्ये अनुसूचित जाती / जमाती व अन्य जातीतील जनतेने भक्कमपणे पाठिंबा देऊन धरणे आंदोलन व भारत बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ब्रह्मपुरी तालुका अनुसूचित जाती /जमाती संघर्ष समितीचे आयोजक, संयोजक यांनी केले आहे.