एस.सी.एस.टी.आरक्षण बचाव कृती समिती गडचिरोली च्या वतीने दि.२१ ऑगष्ट २०२४ रोज बुधवारला गड चिरोली जिल्हा बंद चे आवाहन.

एस.सी.एस.टी.आरक्षण बचाव कृती समिती गडचिरोली च्या वतीने दि.२१ ऑगष्ट २०२४ रोज बुधवारला गड चिरोली जिल्हा बंद चे आवाहन.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : एस.सी.एस.टी. आरक्षण बचाव कृती समिती गडचिरोली च्या वतीने दि. २१ ऑगष्ट २०२४ रोज बुधवारला गड चिरोली जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले असुन दि २१ ऑगस्टला गडचिरोली शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असुन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अनु.जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबतीत मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तात्काळ रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदिय कायदा पारित करावा. 

आरक्षणाचे अ.ब.क.ड. गट पाडण्यात येवू नये कारण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने विविध जातीतील लोकांना एकत्र आणून गुलाबी नष्ट केली परंतु या निर्णयाने फूट पाडून पुन्हा गुलामित टाकण्याचा प्रयत्न होत आहे असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सदर होवू घातलेल्या गडचिरोली बंद मधे सर्व अनु.जाती जमातीच्या लोकांनी संघटना व विविध RPI च्या गटातटातील लोकांनी गडचिरोली बंद च्या कार्यक्रमात येण्याचे आवाहन करण्यात आले. 


पत्रकार परिषदेला प्रा. मुनिश्वर बोरकर प्रा.भाष्कर मेश्राम भोजराज कानेकर,माधवराव गावढ,सदानंद ताराम,प्रशांत मडावी,गुलाबराव मडावी,नितिन पदा,कुणाल कोवे,उमेश उईके,मारोती भैसारे,रोशन उके,मिलिंद बाबोंळे,संदिप गोरडवार,नरेश महाडोरे,सुरेश कन्नमवार,प्रमोद बाबोंळे, प्रमोद राऊत,तुळसिदास सहारे,गौतम मेश्राम,पुरुषोत्तम रामटेके,दुष्यात तुरे,किशोर मेश्राम,सनकु पोटावी,मालती पदा,मालती पुडो,आरती कोल्हे,विद्या दुगा जिल्हा महाग्रामसभा चे कार्यकर्ते सहीत बहुसंख्य Sc / ST समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !