पोंभूर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील,कुणाल संतोष रेगुलवार मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक ; एम.पी.एस.सी.तून भरारी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
पोंभूर्णा : संघर्ष,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधाणोरा येथील शेतमजुराचा मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई,वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.कुणाल संतोष रेगुलवार असे या मुलाचे नाव आहे.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आंबेधाणोरा येथून तर माध्यमिक शिक्षण नवभारत ज्युनिअर कॉलेज मुल येथून पूर्ण करून नागपूर विद्यापीठातून कला शाखेत पदवी पूर्ण केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळत अभ्यासाला सुरवात केली.
वनपरीक्षेत्र,तलाठी,एसटीआय,एएसओ या पदावर प्रतीक्षा यादीत येत थोडक्यात संधी हुकली परंतु जिद्द सोडली नाही.माझ्याकडे हे नाही ते नाही असे न म्हणता फक्त मेहनतीच्या बळावर असाध्य ते साध्य करता येते याचा प्रत्यय कुणाल ने आणून देत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
या यशात आई,वडील,मित्र यांची साथ व आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांची निवड झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक,कुणाल संतोष रेगुलवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना एस.के.24 तास न्युज चॅनल चे उपसंपादक,राजेंद्र वाढई, मुख्य संपादक,सुरेश कन्नमवार, प्रकाश पाचपोर,मिलिंद माथुनकर,राकेश गायधने,पियुश चव्हान,दिनेश चोखारे,रामदास हजारे शुभेच्छा दिल्या.