नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील वाचनालय च्या विद्यार्थ्याची मुर्तिजापूर येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड.

नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील वाचनालय च्या विद्यार्थ्याची मुर्तिजापूर येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड.


एस.के.24 तास


नागभीड : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्तीला सत्यात उतरवत व स्वतःच्या प्रतीकुल परिस्थितीवर मात करत ग्रामपंचायत नवेगाव पांडव वाचनालयांचा विदयार्थी आशिष अनिल मेश्राम, हा मुर्तिजापूर,जिल्हा अकोला येथे कनिष्ठ अभियंता म्हणुन स्पर्धा परीक्षा द्वारे निवडला गेला. 


गावातील हे  वाचनालय २०१९ पासून सरपंच,शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी ग्रामपंचायत नवेगाव पांडवच्या पुढाकाराने सुरू केले. मुलांना पुस्तके सर्व  साहित्य उपलब्ध करून दिले.या अभ्यासिकेला मा.प्रा.महेश पानसे सर,यांनी आजवर अनेक पुस्तकं उपलब्ध करून दिले आहेत. 


मा.डॉ.सतीश भाऊ वारजुकर यांनी सुध्दा टेबल खुर्च्या दिल्या आहेत. मा.श्रीमती शारदा ताई वासुदेव नवघडे यांनी पंखे उपलब्द करून दिल्या आहेत.मा.सौ.सरीता खोब्रागडे मैडम माजी.शिक्षीका ने.ही.विद्यालय नवेगाव पांडव यांचा सुध्दा या अभ्यासिकेला पुस्तकं उपलब्ध करून दिले आहेत. 

          

आज पर्यंत ग्राम पंचायत नवेगाव पांडव च्या वाचनालयातून ७ ते ८ मुलें हे स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी झाले आहेत.वाचनालयाच्या सर्व विध्यार्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांकडून  प्रेरणा घेऊन सामोरे जावे. असा आशीर्वाद ॲड.शर्मिला रामटेके, प्रा.महेश पानसे व सर्व उपसरपंच मा.विजय बोरकुटे, मा.नरेंद्र क्षीरसागर ग्राम विकास अधिकारी,सदस्य मा.रितेश पांडव,


 कल्पना नवघडे, मीराबाई मशाखेत्री,निरंजना सोनटक्के , सुनील शेंडे, देव कन्या पांडव, कर्मचारी विजय नवघडे ,अतुल दादाजी पांडव, रोजगार सेवक सोमेश्वर पांडव, संगणक धनराज अलोने , प्रतिष्ठित नागरीक नवेगाव पांडव यांनी व्यक्त केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !