गुजरीत वेस्टेज भाजीपालामुळे दुर्गंधी ; नगर प्रशासनाचे दुर्लक्ष.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : सर्वोदय वार्ड राममंदिर जवळ जुनीच गुजरी भरतो यात संपूर्ण शहरातील नागरिक भाजीपाला घ्यायला इथेच येतात परंतु भाजीपाला विक्रेते वेस्टेज माल गोबीवरचा पाला वेस्टेज पालेभाज्या दररोज गुजरीतच फेकत असल्यामुळे दुर्गंधी सुटतो.
पर्यायाने भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.ग्राहकांना एकदा दुर्गंधीचा त्रास झाला की दुसऱ्यांदा त्या भागात जातच नाही.गुजरीच्या पश्चिमेला एक नाला आहे.त्या नाल्याचे पाणी सतत वाहत असतो भाजीपाला विक्रेते नेमक्या त्याच भागात वेस्टेज मॉल फेकतात त्यामुळे दुर्गंधी इतकी वाढतो की पावसाळ्यात अख्खा सर्वोदय वार्डात दुर्गंधीसी सामना करावा लागतो.
काही भाजीपाला विक्रेते राममंदिर जवळच्या रस्त्यावर आपले दुकान थाटतात त्यामुळे रहदारी बंद पडतो.पार्किंगला जागा राहत नाही. गर्दीत अनेकांचा अपघातही झालेला आहे.परंतु नगर प्रशासनाला जाग येत नाही.गुजरीतील कचरा फेकणे सोडाच परंतु सर्वोदय वार्डात महिना महिना घंटा गाडीच येत नाही. तेव्हा गुजरीतील वेस्टेंज भाजीपाला दर दोन दिवसांनी तरी घंटागाडी ने डम्पिंग झोन मधे नेवून फेकावा अशी नागरिकांची मागणी आहे.