कोरची येथे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण ; वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक.

 


कोरची येथे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण ; वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक.



मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


 

कोरची : कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉक्टरला बलात्कारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आतिश पंकज सरकार (वय २६, रा. कोरची) असे आरोपीचे नाव आहे.



 

 आरोपी आतिश सरकार याने पीडित २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित युवतीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. युवतीकडील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मानण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याशिवाय पीडित युवतीकडे पर्याय नव्हता.


 


 

 तक्रारीवरून आतिशच्या विरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ८ ऑगस्ट रोजी अटक करून त्याच दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आतिशला अटक झाल्याने वैद्यकीय एकच खळबळ माजली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !