ब्रम्हपुरी च्या पायलने पॉवर लिफ्टींग स्पर्ध्य मधे ३ गोल्ड मेडल पटकाविले.
अमरदीप लोखंडे !! सहसंपादक !!
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/०८/२४ धुळे पॉवर लिफ्टींग असोशीएशन व A L S फिटनेस,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग, पॉवर स्काड,बेंच प्रेस,डेडलिप्ट चम्पियन स्पर्धा २०२४ घेण्यात आली होती.
ब्रम्हपुरी शहरातील पायल लालजी नागरे हीने पॉवरलिफ्टींग स्पर्धा ज्युनियर ,५८की गटात सहभाग घेतला .पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये ब्रम्हपुरी च्या पायल नागरे हिने ३ गोल्ड मेडल पटकावून प्रथम स्थान प्राप्त केले.तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ज्युनिअर Strongest girl of Maharashtra State 2024 व ओपन बेंच प्रेस या
सिंगल इव्हेंट मध्ये opne bench press super women of Maharashtra State 2024 असे दोन टायटल प्राप्त केलेले आहेत.झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत वेट पायल नागरे हिला सन्मान चिन्ह,गोल्ड मेडल तसेच दोन टायटल प्रदान केले गेले.
पायल हिच्या घवघवीत यशाने क्रीडा क्षेत्रात ब्रम्हपुरीचे नाव गौरवाने घेतल्या जात असून पायल जिम ट्रेनर म्हणून काम करीत आहे.आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल आवळे चंद्रपूर तसेच आई वडील यांना दिले आहे.तिच्या उतुंग कामगिरी मुळे तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.