सकल धनगर समाजाचे राज्य समन्वयक प्रा.शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली ; धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ९ सप्टेंबर पासून पंढरपुरात उपोषण.

सकल धनगर समाजाचे राज्य समन्वयक प्रा.शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखालीधनगर समाजाच्या आरक्षणासाठी ९ सप्टेंबर पासून पंढरपुरात उपोषण.


एस.के.24 तास


सोलापूर : मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम असताना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सकल धनगर समाजाने येत्या ९ सप्टेंबरपासून पंढरपुरात उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने समाजाच्या शिष्टमंडळाने सोलापुरात जिल्हाधिकारी,कुमार आशीर्वाद यांना भेटून निवेदन सादर केले आहे.


सकल धनगर समाजाचे राज्य समन्वयक प्रा. शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाबाबतची पूर्वसूचना दिली.या शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,अमोल कारंडे, सुनील बंडगर,निमिषा वाघमोडे,देवीदास पाटील, सुभाष म्हस्के,देवेंद्र मदने,सिद्धारूढ बेडगनूर, अतुल गावडे, यशवंत नरुटे,यलगुंड सातपुते,राम वाकसे आदींचा समावेश होता.


प्रा. बंडगर म्हणाले,धनगर समाज अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या साठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रत्येक शासनाने आश्वासनापलीकडे पदरात काहीही दिले नाही. त्यामुळे समाजात सरकारच्या विरोधात असंतोष वाढला आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !