महायुतीत मित्र पक्षाना मानसन्मान मिळत नाही.पीरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार,प्रा.जोगेंद्र कवाडे राज्य स्तरीय अधिवेशनात नांदेड येथे खंत व्यक्त केली.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
नांदेड : महायुतीत मित्रपक्षांना मान सन्मान दिल्या जात नाही अश्या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वासी समन्वय साधावा जे लोकसभेत घडले ते विधानसभेत घडता कामा नये घटक पक्षाना सत्तेत सहभागी करून घ्यावे. ओबिसी आरक्षणाला धक्का न लावता ५० % पेक्षा मर्यादा वाढवून मराठयांना आरक्षण घ्यावे.
असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य स्तरीय अधिवेशनात नांदेड येथील शासकीय विश्राम गृह हाल नांदेड येथे पीरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले. पीरिपाच्या राज्य स्तरीय अधिवेशनात मुख्य मार्गदर्शक म्हणुन प्रा. जोगेंद्र कवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून पिरि पाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदिप कवाडे ,
महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष गणेशभाई उणवणे,प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले,मराठवाडा अध्यक्ष गणेशभाई पडधन तर निमंत्रक पिरिपाचे माजी नगरसेवक बापुराव गजभारे आदि लाभले होते. याप्रसंगी कार्याध्यक्ष चरणदास इंगोले म्हणाले की पीरीपा.पक्षाला वाढविण्यास कार्यकर्त्यांनी गती घ्यावी जिल्हयात मेळाव्याचे आयोजन करावे व भारत बंद ला पाठिंबा घ्यावा. जयदिपभाई कवाडे यांनी सांगीतले की कार्यकर्त्यांनी नाराज होता कामा नये आतापासूनच जोमाने कामाला लागावे.
वेळ पडल्यास पीरीपाचे स्वतंत्र उमेदवार उभे करू आपली तयारी ठेवा. एकंदरीत महाराष्ट्रातुन आलेल्या जिल्ह्याध्यक्षाचा सुर युती तोडावी अशा होता. बैठकीस गडचिरोली जिल्हयातून जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर , कार्याध्यक्ष,मुरलीधर भानारकर उपाध्यक्ष,मारोती भैसारे आदि सहीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांनी बैठकीत हजेरी लावली होती.