संविधान जागर यात्रा ; आरक्षण खत्म करणार,संविधान बदलविणार अशी भाषा करणाऱ्या विरोधकापासुन सावधान. - माजी खासदार,अशोक नेते.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - भाजपा आता संविधान बदलविणार आहे अशा खोटा प्रचार कांग्रेस आघाडीने लोकसभा निवडणुकीत करून ८०-९० खासदार निवडून आणण्यापर्यंत मजल मारली भारत बंद मधे आरक्षणाला धोका नसतांना सुद्धा इतर घटक पक्षानी भारत बंद केला परंतू संविधानाचे आम्ही रक्षण करतो म्हणणारे कांग्रेसवाले Sc / ST च्या लोकांनी आरक्षणाबाबत भारत बंद केला.आणि कांग्रेसवाले मात्र लपून बसले तर काही पळाले हे काय संविधानाचे रक्षण करणार हे आता जनतेच्या लक्षात येत आहे.
संविधान जागर मेळावा श्री,संत रोहितदास महाराज मंदिर,फुले वार्ड गडचिरोली येथे पार पडला.या प्रसगी आमदार डॉ.देवराव होळी म्हणाले की केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार ने अनेक योजना आणल्या महिलांना निराधार योजनेचे पैसे मिळत आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे. मोफत राशन मिळत आहे. बेघरांना घरकुल,बेरोजगारांना रोजगार,कास्तकारांना विस हजार आदि अनेक योजना आपल्या दारी आल्यात आज महिला व कास्तकार आनंदित आहे.असे अच्छे दिन कांग्रेसच्या काळात आपण कधिही पाहिले नाही.गडचिरोली जिल्याचा विकास झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल संविधान,संविधानाला कुणीही बदलू शकणार नाही.या प्रसंगी भाजप नेत्यां स्नेहाताई भालेराव मुंबई म्हणाल्या की भाजपाच्या काळात महिलांना महिण्यापोटी दिड हजार मिळाले.
कांग्रेस वाले म्हणत होते की आम्ही निवडुन आल्यावर प्रत्येकांच्या खात्यावर आठ हजार खटाखट खटाखट ! खोटे आश्वासन देणारे कांग्रेसवाले आता ते कुठे गेलेले ? अशा लोकापासून आपण सावध राहावे असेही त्या म्हणाल्या. याप्रंसगी राजेंद्र गायकवाड नाशिक,योजनाताई ठोकले मुंबई,विजय गव्हाळे , नागसेन पुडके आदि भाजप नेत्यांनी संविधान प्रती आपले विचार मांडले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा योगीता पिंपरे , आदिवासी नेते प्रकाश गेडाम,प्रमोद पिंपरे,रमेश भुरसे,दलित आघाडी भाजपाचे,जनार्धन साखरे , देवाजी लाटकर,चर्मकार समाजाचे अध्यक्ष नामदेव काटवले,वालदे,मोरेश्वर म्हशाखेत्री,संदिप वादिकर ' रविंद्र खवसकर , सोनाल काटवले , शितल म्हशाखेत्री , उर्मीला नवले आदि साहित भाजपाचे कार्यकर्ते चर्मकार समाज बांधव , बौद्ध बांधव बहुसंखेनी उपस्थित होते.