चंद्रपूर मध्ये दारूच्या नशेत सख्या भावानेच केली आपल्याच सख्या भावाची हत्या.


चंद्रपूर मध्ये दारूच्या नशेत सख्या भावानेच  केली. आपल्याच सख्या भावाची हत्या.


राजेंद्र वाढई - उपसंपादक

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्य मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी व मर्डर चे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे दिसून येते आहे.आर.टी.ओ.ऑफिस चंद्रपूर च्या मागे एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या मध्ये दारू च्या नशे मध्ये सख्या भावाने स्वत च्या सख्या भावाची हत्या केलेली आहे.


 मतृक व्यक्ती नामे. गणेश पुंडलिक राव गेडाम यांचे सख्खे भाऊ मंगल पुंडलिक राव गेडाम यांनी  दारू च्या नशे मध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2024 ला रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान सुमारास मृतक व्यक्ती नामे.गणेश पुंडलिक राव गेडाम हे आपल्या घरी जेवण करण्या करिता बसलेले होते. 


तेव्हा त्याचे सख्खे भाऊ आरोपी,मंगल पुंडलिक राव गेडाम हा दारूच्या नशेत घरी घेऊन  मृतक व्यक्ती नामे.गणेश पुंडलिक राव गेडाम च्या सोबत शुल्क च्या कारणा वरून वाद - विवाद करायला सुरुवात केली. व त्यावेळी आरोपी मंगल पुंडलिक राव गेडाम यांनी आपल्याच सख्या भावा वर कुऱ्हाडी ने हल्ला केला.


या हल्ले मध्ये. आरोपी मंगल पुंडलिक राव गेडाम यांचे सख्खे भाऊ . गणेश पुंडलिक राव गेडाम यांना डोक्यावर आणि मानेवर जबरदस्त मार लागल्याने. गणेश गेडाम हे अतिशय गंभीर परिस्थिती मध्ये जखमी झाले. या वेळी त्याच्या वार्डातील लोकांनी त्यांना त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानांच त्यांनी आखरीचा स्वार्स सोडला.आणि त्यांच्या मृत्यू झाला. 


या घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशन ला मिळताच. रामनगर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी व अधिकारी घटना स्थळी दाखल होऊन आरोपी.मंगल पुंडलिक राव गेडाम यांना अटक करून मृतक व्यक्ती नामे. गणेश पुंडलिक राव गेडाम यांच्या पोस्टमार्टम करण्या करिता . ग्रामीण  जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. 


या संपूर्ण घटने मुळे चंद्रपूर शहरातील लोकांना अतिशय धक्का बसला आहे. यावेळी रामनगर पोलीस स्टेशन येथील वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे की आम्ही आरोपी मंगल पुंडलिक राव गेडाम यांच्या वर योग्य प्रकारे कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करणार आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !