माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचा विधवा लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीचा हात.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०६/०८/२४ गेल्या काही महिन्यापूर्वी बोद्रा येथील श्री.भोजराज शेंडे ही व्यक्ती कुटुंबाच्याउदरनिर्वाहासाठी काम करून दोन पैसे मिळवावे या हेतूने बाहेरगावी बोध भरायला गेला होता.तिथे काम करीत असताना 6 जून 2023 रोजी तिथे त्याचा अचानक मृत्यू झाला. भोजराज शेंडे यांचे अतिशय गरीब कुटूंब.. लहान लहान मुले... घरात कमावता व्यक्ती कोणी नाही.. घरातील कर्ता पुरुष सोडून गेल्यावर त्याच्या अर्धांगिनी श्रीमती गंगा भोजराज शेंडे या पार कोलमडून गेल्या.
त्यांना कोणीतरी धीर देणे गरजेचे होते. त्यांना थोडीफार मदत करण्याची आवश्यकता होती. गावातील कार्यकर्त्यांनी ही बाब भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुणजी शेंडे सर यांचे निदर्शनास आणून दिली. प्राचार्य अरुण शेंडे सरांनी तात्काळ गोरगरीब जनतेचे कैवारी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर यांना सांगितली.
गुरुवार १ ऑगस्ट रोजी प्रा.अतुलभाऊ देशकर आपल्या सहकाऱ्यांसोबत श्रीमती गंगा भोजराज शेंडे यांचे घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा विश्वास देऊन आर्थिक मदत देखील केली. यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे विस्तारक प्रा.कादर शेख सर, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे सर,
भाजपा ज्येष्ठ नेते उत्तम पाटील शेंडे, संजय पाटील सगळाम, गुरुदास संग्रामे पोलीस पाटील, विनायक पाटील संगळाम इत्यादी यावेळी उपस्थित होते.या मदतीने गंगाबाईचा चेहरा समाधानी दिसत होता.अतुलभाऊंच्या कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.