ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा ‘ त्या ’ बाप - लेकाची एकत्र अंत्ययात्रा ; समाजमन सुन्न..!
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : नातेवाईकाकडील कार्यक्रमासाठी वडील चिमुकल्या मुलाला घेऊन दुचाकीने निघाले.वाटेत काळरूपी मालवाहू वाहन समोर आले.या वाहनाला दुचाकी धडकली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.अपघातात वडिलांचा घटनास्थळीच,तर चिमुकल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त झाली. यानंतर बापलेकाची एकत्र अंत्ययात्रा निघाली अन् समाजमन सुन्न झाले. " खेळ कुणाला दैवाचा कळला ?…’ याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आला.
शनिवारी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी - आरमोरी मार्गावरील खरकाडा फाट्यावर उभ्या असललेल्या पीकअप वाहनावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात वडील उमेश गणपत ठाकरे वय,37 वर्ष रा.खरकाडा) यांचा घटनास्थळीच, तर वैभव उमेश ठाकरे वय,5 वर्ष या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथे ठाकरे कुटुंबीय राहतात.उमेश ठाकरे हे आपल्या मुलासोबत ब्रह्मपुरी येथील नातेवाईकाकडे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते.तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुलासह खरकाडा गावाकडे येण्यास दुचाकीने निघाले.ब्रह्मपुरी - आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील खरकाडा फाट्यावर उभ्या असलेल्या पीकअप वाहनावर उमेश यांची दुचाकी धडकली.
उमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुचाकीवर पुढे बसून असलेला मुलगा वैभव हा गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.गावकऱ्यांनाही या घटनेची माहिती मिळाली. पोलीस,गावकरी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी असलेल्या वैभवला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री 10.00 वा.ताच्या सुमारास त्यानेही जगाचा निरोप घेतला.
बापलेकांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक,बालाजी चव्हाण,अंकुश आत्राम, राहुल लाखे,विजय मैंद, मुकेश गजबे,संदेश देवगडे,अनुप कवठेकर यांनी घटनास्थळी दाखल नागरिकांची गर्दी पांगवली.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
मागील महिन्यात वैभव ने वयाची 5 वर्षे पूर्ण केली होती. ठाकरे कुटुंबीयांनी मुलाचा वाढदिवस जोरात साजरा केला.संपूर्ण गावाला गोडजेवण दिले.चिमुकला मुलगा अनेकांचा लाडाचा होता.रविवारी बाप - लेकाची एकत्रच अंत्ययात्रा निघाली.दोघांवरही एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावातील लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनीच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत त्यांना अखेरचा निरोप दिला.या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले.दरम्यान, या अपघातानंतर रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने धडक दिली.यात सोमेश्वर ठाकरे हा जखमी झाला.