उद्या गडचिरोली बंद चे आवाहन पत्रकार परिषद.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : एस.सी.एस.टी.समाज संघटना गडचिरोली तर्फे उद्या गडचिरोली शहर बंद व चौकात धरणे आदोलन चे आवाहन करण्यात आले.अनु जाती / जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबतीत मा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तात्काळ रद करण्यासाठी केंद् सरकारने संसदिय कायदा पारित करावा.
आरक्षणाचे अबकड गट पाडण्यात येवू नये अश्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे असे गडचिरोली ऑल मिडिआ अशोशिएशन (गामा) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली.उद्या सकाळी ९ वाजता सर्व एस.सी.एस.टी.संघटनानी होणाऱ्या धरणे आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
पत्रकार परिषदेला प्रा.मुनिश्वर बोरकर,प्रा.भाष्कर मेश्राम,ॲड राम मेश्राम कुणाल कोवे,भोजराज कानेकर,मिलिंद बांबोळे,सुधिर वालदे,तुळसिदास सहारे,सुरेश कन्नमवार,प्रेमदास रामटेके,गौतम काळे, विद्या कांबळे,नरेश महाडोरे पुडो,वनिता पदा,भाग्यश्री कुमरे,अरविंद वाळके,रेखा कुंभारे,आर्वती वाळके, लवकुस भैसारे,वालदे सर,आदि हजर होते.