सायबर क्राईम पासून सजग असणे आवश्यक. - डॉ.डी.एच.गहाणे

सायबर क्राईम पासून सजग असणे आवश्यक. - डॉ.डी.एच.गहाणे


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे,कारण सायबर क्राईम हा जगातील फसवणूकीबाबब खुप मोठे जाळे देशात पसरले आहे.आपल्याला माहित नसते की,आपली फसवणूक कशी केली जाते. अलिकडे सायबर व्दारे आँनलाईन चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी सोसलं मिडीयाव्दारे आपले फ्रेण्डशिप स्वीकारताना आपल्या जवळच्या व ओळखीचेच असणे आवश्यक आहे.


 अनोळखी व्यक्तीशी सोसलमिडियावर मैत्री करु नये वेगवेगळे आमिष देऊन मूलींना फसविले जाते. अश्लील प्रकरणात फसविणूक केली जाते त्यासाठी वेळीच सावध असणे व खोट्या भूलथापांना बळी न पडता सुरक्षित जीवन जगावे अन्यथा सायबरमुळे आपली फसवणूक होवू शकते असे मौलिक विचार प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांनी व्यक्त केले. 


कार्यक्रमाचे आयोजन नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल राष्ट्रीय सेवा योजना व मतदान साक्षरता मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी विचार पीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी एच गहाणे हे उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थिती डॉ वर्षा चंदनशिवे राज्यशास्त्र विभाग प्रमुख, डॉ.प्रकाश वट्टी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ विवेक नागभिडकर,डॉ.दर्शना उराडे रासेयो कार्यक्रमाधिकारी म्हणून उपस्थित होते.


यावेळी मतदान साक्षरता मंडळाच्या वतीने डॉ वर्षा चंदनशिवे यांनी मतदार नोंदणी व मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रुपेश वाकोडीकर यांनी केले.तर आभार डॉ.प्रकाश वट्टी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विवेक नागभिडकर,डॉ.दर्शना उराडे,रासेयो स्वयंसेवक, मयूर संजू मेश्राम सर यांनी परिश्रम घेतले. 


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !