सेवानिवृत्ती आणि सेवापूर्ती गौरव सोहळा.
एस.के.24 तास
गडचिरोली : काटली स्थानिक कै.सी .पा.मुनघाटे हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज येथील कार्यरत असलेले शिक्षक पी.एम. राऊत .आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष मा.मुख्याध्यापक एन.आर. मंगर होते. प्रमुख पाहुणे गावातील ज्येष्ठ नागरिक हरिदास बोरकुटे, शाळा समितीचे सदस्य नेमाजी शिवणकर
परशुराम पाटील मुनघाटे,चुडाराम खंडारे, तसेच शाळेचे शिक्षक ताराचंद कोटांगले ,अजय वरदलवार, अजय ताटेवार, संजय बोदलकर, मोहन पराते, तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोहितकरजी, शिंपीजी, वारजुरकरबाबू ,आणि पोटावी तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी पी.एम.राऊत. सह पत्नी सौ अर्चना यांचा शाल श्रीफळ देऊन सेवानिवृत्ती पर मा. मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
याच प्रसंगी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करून शाळेला भेट देण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त सर्व मान्यवरांचे मनोगत घेण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. अजय ताटेवार आभार प्रदर्शन मा. संजय बोदलकर सर यांनी केले.