तथागत बुद्धांच्या अस्थिकलस यात्रा बाबत दिक्षाभूमी बुद्ध विहार देसाईगंज नियोजन.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
वडसा : देसाईगंज (वडसा)- तथागत बुद्धांच्या अस्थिकलस यात्रा श्रीलंका येथील भिक्खुसंघ महाराष्ट्रात बुद्धाचे अस्थिकलस आणत आहेत त्यातील गडचिरोली जिल्हातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदपर्शानी पवित्र दिक्षाभुमी देसाईगंज वडसा येथे भगवान बुद्धांच्या अस्थिकलस यात्रा २६ सष्टेंबर २०२४ ला येत आहे.
त्या संबंधाने कार्यक्रमाची रूपरेषा दिक्षाभूमी बुद्ध विहारात ठरविण्यात आली.इंडो अशियन मेथ्या फाऊंडेशन तर्फे आयोजीत अस्थि कलस यात्रा सोबत श्रीलंकेचे ५१ भिक्खू चे आगमण होणार आहे.
त्यादृषीने कार्यक्रमाचे नियोजन म्हणुन पुज्य भन्ते प्रज्ञारत्न आग्रा,सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपूरे ,प्रा.मुनिश्वर बोरकर ,मारोतराव जांभुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत साधक - बाधक चर्चा करण्यात आली.
बैठकीला सम्येक जागृत बौध्द समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा,कविता मेश्राम,सचिव,ममता जांभुळकर,उपाध्यक्ष,श्यामला राऊत,ममता नंदेश्वर,लिना पाटिल प्रतिमा बडोले,निशा साखरे,यशोदा मेश्राम,सरिता बारसागडे,आशा रामटेके,सहीत बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थितीत होत्या.