कंत्राटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या. - सिद्धार्थ सुमन
मुनिश्वर बोरकर
भद्रावती : नगर परिषद भद्रावती येथे मागील आठ ते दहा वर्षापासून कार्यरत कंत्राटी कामगारांच्या कामबंद आणि ठिय्या आंदोलनास बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ने समर्थन दिले असून कंत्राटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची महाराष्ट्र राज्य सचिव सिद्धार्थ सुमन यांनी केलेली आहे.
कामगार कायदा 1948 नुसार कामगार विभाग महाराष्ट्र शासनाची दि. 15/2/2024 ची स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रा. पं. वगळुन)या करिता कामगारा़चे किमान वेतन निर्धारित करणारी अधिसुचना आणि मा. उपसचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचे उपरोक्त अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देणारे दि. 22/1/2016 चे परिपत्रकानुसार किमान वेतन लागू करने आणी कामगारांना सर्व सुविधा देणे.
इत्यादी मागण्या करीता येथील नगर परिषदेत विविध विभागात कार्यरत कंत्राटी कामगार.दि 6/8/24 पासून नगर परिषद कार्यालयासमोर कामबंद आणि ठिय्या आंदोलन करीत आहेत . बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा कामगारांच्या आंदोलनास समर्थन आणी न्याय मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करणारे निवेदन मा. मुख्याधिकारी, नगर परिषद भद्रावती यांना देण्यात आले.
त्यानंतर सिद्धार्थ सुमन यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलन कर्त्यांना समर्थनाचे पत्र दिले. सोबत बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे संतोषभाई रामटेके, सादिक शेख हे होते. यावेळी राहुल सोनटक्के, राजू चौहान, संदीप चटपकर, शारदा नाने, शेवंता शिवरकर, अजय खंदारे, दिलीप पचारे, सागर शिवरकर, धनंजय महाशिरकर, लिमेश माणुसमारे, संजय मेश्राम, रोशन पचारे, राहुल नाने, विशाल पचारे, विलास राऊत, परेश वानखेडे, ज्ञानिवंत जांगळे इत्यादी आंदोलक कामगार उपस्थित होते.